Tuesday, November 16, 2010

किल्ले बांधा स्पर्धे २०१०

किल्ले बांधा स्पर्धे २०१०







दिवाळीच्या दिवसात  गुरुवारची सुट्टी साधून किल्ले बांधा स्पर्धा भघण्याचा योग आला. अंशुल ला घेऊन मी सकाळी ११.०० च्या सुमारास नवीन मराठी शाळेच्या आवारात पोहोचलो.


"सकाळ माध्यम समूहा'तर्फे आयोजित "पुणे दिवाळी फेस्टिव्हल' उपक्रमांतर्गत इतिहासाचा वारसा जोपासणाऱ्या "किल्ले बांधा स्पर्धा" भरवण्यात आली होती .सर्वच वयोगटांतील उत्साही मंडळींनी नवीन मराठी शाळेच्या आवारात किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती साकारल्या होत्या.


दिवाळीमध्ये किल्ले बनविणे, या मुलांच्या आवडीच्या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी, ही स्पर्धा घेण्यात आली होती. विशेष म्हणजे पानिपतच्या रणसंग्रामाला 14 जानेवारी 2011 रोजी 250 अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या रणसंग्रामाची पार्श्‍वभूमी व तेथे घडलेला इतिहास मुलांना समजावा यासाठी इतिहासप्रेमी मंडळाच्या सहयोगाने भव्य कार्यक्रम सादर केला. 40 फूट लांबी-रुंदीची भव्य प्रतिकृती, प्रमाणबद्ध नकाशे, इतिहास जिवंत करणारी चित्रपटदृश्‍ये, अभ्यासपूर्ण निवेदन व प्रभावी पार्श्‍वसंगीत अशी त्याची वैशिष्ट्ये होती.


किल्ले बनवा स्पर्धा हा उपक्रम कौतुकास्पद असून, यंदा मुलांनी केलेली मेहनत व त्याला पालकांची साथ यामुळे आकर्षक प्रतिकृती साकारल्या आहेत. याद्वारे मुलांनी केलेला इतिहासाचा अभ्यासही समोर आला आहे.


स्पर्धकांनी बनविलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे बारकावे टिपण्याचा  योग आला.

प्रसिद्ध किल्ले कलाकार कमलेश धार्मिक यांनी साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीही आम्हांला या प्रदर्शनात बघायला मिळाल्या.

'किल्ले बांधा स्पर्धेचे छायाचित्रीकरण खालील सकेंतस्थळावर उपलब्ध आहे

http://picasaweb.google.com/a2yshindephotography/2010?authkey=Gv1sRgCO-Bhov--LuSOg&feat=directlink


प्रदर्शनाच्या ठिकाणी शिवदिग्विजय मर्दानी लोककला प्रबोधिनीतर्फे युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जात होती.





योगेश शिंदे.