Saturday, August 20, 2011

श्री क्षेत्र नागनाथवाडी

श्री क्षेत्र नागनाथवाडी.



 
क्षेत्र नागनाथवाडी ललगुण सातारा येते ऐतिहासिक पंचक्रोशीतील येरळा नदीच्या निसर्गरम्य काठावरील पुरातन शिवमंदिर म्हणजेच श्री नागनाथ देवाचे स्वयंभू आणी जागृत शिवतीर्थ श्री क्षेत्र नागनाथवाडी येथे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.


या शिवमंदिरातील पाषाण रुपी शिवलिंग स्वयंभू आणी जागृत असून ते जमिनी पासून २५ फुट खोल पाण्यात आहे. या शिवलिंगातून जशी शंकरच्या जठेतून अखंड गंगा वाहते तशाप्रकारे अखंड पाण्याचा झरा वाहत आसतो. फक्त प्रती सोमवारी मंदिरातील पणी काढून शिवलिंग उघडे केले जाते .




यावेळी असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवलिंगाला दूध आणि पंचामृताने स्नान घालून यथाविधी पूजा केली जाते आणी नंदादीप लावून शिवारथी होवून शिवभक्तांचा रुद्राभिषेक केला जातो.


 

प्रत्यक्ष नागराज दर्शन .

 
श्री नागनाथ मंदिरातील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे या ठिकाणी १फुटभर लांबीचे हाताच्या बोटाएवढया जाडीचे छोटे छोटे नागराज प्रकट होतात. आणी ते नागराज फक्त श्रावन महिन्यातच प्रकट होतात.

 


हे नागराज मंदिरातील सिंहासनावरील देवाचे गादीवर संपूर्ण श्रावण महिना शिवभक्तांचे दर्शनासाठी ठेवले जातात्त. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सार्वजन हे शिवरूपी नागराज प्रत्यक्ष हातात घेऊन धन्य होतात.


नवसाला पावणारा देव म्हणून याची विशेष प्रसिद्धी आहे.विषेशता: स्त्रियांचे ते आराध्य दैवत मानले जाते.


श्रावण महीनायचा शेवटच्या सोमवारी मोठी जत्रा भारती आणि श्रावणी आमव्शाच्या दिवशी हे सर्वे नागराज या चिंचेच्या बुण्द्यात सोडले जातात... या झाडाच्या खोडातून हे सगळे नागराज गुप्त होतात ....

 







नागनाथवाडी ला कसेजाल .
मंदिराचा पत्ता.

श्री क्षेत्र नागनाथवाडी लालगुन,
ता. खटाव, जिल्हा. सातारा.

पुणाय्हून साधारण १५० केलोमीटर


 

 
पब्लिक त्रन्सपोर्ट.

महाराष्ट्रराज्यची स्टेट त्रन्सपोर्ट ची सातारा पर्यंतची बस घेणे, सतराय्वरून पुसेगाव साठी दुसरी बस पकडून पुसेगावात जाने (पुसेगावासाठी ठराविक वेळेच बस आसते), तीतून लोकाल जीप नी नागनाथवाडी पर्यंत जाने .


गाडीनी:-

ऐन एच: ४ पुणे ते सातारा महामार्ग घेऊन सातारा (११० कि.मी.) पर्यंत जाने साताराय्पासून डाव्या हाताला कोरेगाव फाट्या वरून कोरेगाव (२२ कि.मी.) कोरेगाववरून पुसेगाव (१८ की. मी.) पुसेगाव वरून नागनाथवाडी (६ की.मी. ).





रेल्वे .

पुणे स्टेशन ते कोरेगाव – सातारा स्टेशन(पाय्सेंजर रेल्वेनी) कोरेगाव पर्यंत जाने कारेगाव वरून एसटी किवा लोकाल जीप पकडून पुसेगाव किवा थेट नागनाथवाडी ला जाने .


या दिवशाच्या अधिक छायाचित्रीकरण खालील सकेंतस्थळावर उपलब्ध आहे.

authuser=0&authkey=Gv1sRgCI_Lq6_gpvHbIQ&feat=directlink



धन्यवाद,

योगेश शिंदे

email me @ a2yshindephotography@gmail.com

No comments:

Post a Comment